धुळ्यात मोटारसाईकल चोरट्यांची टोळी जेरबंद

0

साडे आठ लाख किमंतीच्या 17 दुचाकी जप्त

धुळे- शहरातील चाळीसगावरोड पोलीस ठाण्याच्या पथकाने मोटारसाईकल चोरी करणार्‍या टोळींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तब्बल साडे आठ लाख किंमतीच्या 17 गाड्या चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. शहरासह जिल्ह्यात मोटारसाईकल चोरी होण्याचे प्रमाण अधिक आहे. ही परीस्थिती लक्षात घेता निरीक्षक कुबेर चौरे यांनी शोध पथकाला तपासाचे आदेश दिली होते. शोध पथकातील पोलीस कर्मचार्‍यांनी 0 सप्टेंबर रोजी पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना शैलेश पाटील (रा. बाभुळवाडी) हा संशयितरित्या फिरतांना आढळून आला. त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्याच्याजवळ (एम.एच.18 एएस 0386) ही मोटारसाईकल चोरीची असल्याचे समोर आले. शैलेश याला पोलीस खाक्या दाखविताच त्याने गावातील अजय उर्फ बंटी गोपीचंद पाटील आणि राकेश अर्जुन पाटील या दोघा साथीदारांची नावेही सांगितली.

अट्टल चोरट्यांची टोळी गजाआड
या टोळीने शहरातील जिल्हा रुग्णांलय, चिरंतन हॉस्पिटल, सिध्देश्वर हॉस्पिटल, बारा पत्थर, वडजाईरोड, अमळनेर, पारोळा बसस्थानक येथून मोटारसाईकल चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून 17 मोटरसाईकल जप्त करण्यात आल्या आहेत. हस्तगत केलेल्या मोटारसायकलची किमंत आठ लाख 40 हजार रुपये आहे. ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुबेर चौरे, पोलीस कर्मचारी राजेश इंदवे, संदीप कढरे, संदीप खैरनार, प्रेमराज पाटील, जोएब पठाण, सुशिल शेंडे, हेमंत पवार यांच्या पथकाने केली.