धुळ्यात भाजपासह आमदार अनिल गोंटेची सोशल मिडीयावर बदनामी : शहर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा

0

धुळे- भारतीय सेना, केंद्र सरकार आणि राज्य सरकार तसेच भारतीय जनता पार्टीसह धुळ्याचे आमदार आमदार अनिल गोटे यांची सोशल मीडियावरुन बदनामी केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात हर्षल विभांडीक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. योगेश मुकुंदे यांनी याबाबत फिर्याद दिली. दरम्यान, कुणीतरी आपला मोबाईल हॅक करून हा प्रकार केला आहे. मोबाईल हॅकर शोधण्यासाठी आपण स्वत:च आपला मोबाईल पोलिसांकडे सुपुर्द केला असल्याची माहिती डिजिटल क्रांतीचे प्रणेते हर्षल विभांडीक यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.

आमदार अनिल गोटेंची बदनामी
आमदार अनिल गोटे यांच्या नावाने व्हॉटसअ‍ॅप व सोशल मीडियावरील इतर माध्यमातून भारतीय सेना, केंद्र आणि राज्य सरकार, भाजपा तसेच आमदार गोटे यांच्यासह भाजपाच्या आजी-माजी पदाधिकार्‍यांची समाजात बदनामी व्हावी म्हणून एक बनावट व दिशाभूल करणारी बदनामीकारक असत्य कथन करणारी पोस्ट व्हायरल झाली़ या पोस्टमध्ये भाजप नेते सुनील नेरकर, भिमसिंग राजपूत, संजय बोरसे, चेतन महाले, शिरीष शर्मा, अमित खोपडे, अमोल भागवत, नितीन शिंदे, रवि शुक्ला, हेमंत मराठे, नंदू ठोंबरे, दादाभाऊ पहाडी, स्वप्निल कुलकर्णी हे 2 ऑक्टोबर रोजी लोकसंग्राममध्ये प्रवेश करणार आहे़ तसेच यापुढील निवडणूका लोकसंग्रामतर्फे लढवू याशिवाय इतर बदनामी करणारा, दिशाभूल करणारा मजकूरही पोस्टमध्ये टाकण्यात आला़ याप्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल झाल्यानंतर अशोक नगरातातील हर्षल विभांडीक यांनी हा प्रकार केल्याचे कळाल्यानंतर संशयावरुन त्यांच्या विरोधात शहर पोलीस स्टेशनला फिर्याद देखील झाली़

Copy