धुळ्यात पाच लाख रुपये किंमतीचा सुका भांग जप्त

0

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : चार हजार 530 किलो सुका भांग जप्त

धुळे – शहरातील देवपूर भागातील बिलाडी रोडवरील एकता नगरात भांगचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने टाकलेल्या धाडीत चार लाख 78 हजार 500 रुपये किंमतीचा तब्बल चार हजार 530 किलो सुका भांग जप्त करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईने अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. मंगळवार, 25 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर घर मालक यशवंत सैंदाणे व संशयीत आरोपी दीपक कुर्‍हे पसार झाले असून पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे.

गुप्त माहितीवरून कारवाई
स्थानिक अन्वेषण विभागाच्या पथकातील कर्मचारी गौतम सपकाळ आणि राहुल सानप यांना धुळ्यातील देवपूर भागात भांग विक्री-खरेदी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वरीष्ठांना माहिती दिल्यानंतर मंगळवारी सकाळी एकता नगरातील यशवंत दौलत सैंदाणे यांच्या प्लॉट नंबर 133 घराची झडती घेतली असता 174 गोण्यांमध्ये सुका भांग आढळला. प्रत्येक गोणी 25 किलो वजनाची असून बाजारभावानुसार चार हजार 530 किलो भांगाची किंमत चार लाख 78 हजार 500 रुपये असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे यांनी भेट देत पथकाचे कौतुक केले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुनहे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, अनिल पाटील, रफिक पठाण, महेंद्र कापुरे, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, गौतम सपकाळे, राहुल सानप, विलास पाटील, तुषार पारधी आदींच्या पथकाने केली. आरोपींविरुद्ध देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Copy