धुळ्यात दिड कोटींच्या गुटख्यांसह तिघे जाळ्यात

धुळे गुन्हे शाखेची दमदार कामगिरी : संशयीत उत्तरप्रदेशातील रहिवासी

धुळे : धुळे गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्यासह तीन ट्रक मिळून एक कोटी 52 लाख 28 हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याने गुटखा तस्करांच्या गोटात खळबळ उडाली तीन ट्रक चालकांना अटक करण्यात आली असून पोलिस आता म्होरक्यांचा शोध घेत आहेत. महेंद्र रामनवल तिवारी (40), प्रमोद जटाशंकर उपाध्याय (35) आणि गोवर्धन जंगीलाल गौड (26, तिघेही रा.उत्तरप्रदेश) अशी अटकेती आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलजवळ आयशर वाहरनात गुटखा असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. वाहन (एम.एच.48 बी.एम.3713 आणि एम.एच. 48 ए.जी. 3718) क्रमांकाचे दोन ट्रक आणि साक्री रोडवरील नेर गावाजवळून (एम.एच. 48 ए.वाय.3929)क्रमांकाचा ट्रक ताब्यात घेण्यात आले व तपासणीत प्रत्येक ट्रकमध्ये 45 लाख 76 हजार प्रमाणे एक कोटी 37 लाख 28 हजार रुपये किंमतीचा गुटखा आढळला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्यासह त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक सुशांत वळवी, योगेश राऊत, कर्मचारी श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संदिप थोरात, सुनील विंचुरकर, रफिक पठाण, महेंद्र कापुरे, संजय पाटील, संदिप पाटील, रविंद्र माळी, संतोष हिरे, संदिप सरग, प्रकाश सोनार, अशोक पाटील, गौतम सपकाळे, हेमंत सोनवणे, मनोज पाटील, चेतन कंखरे, उमेश पवार, विशाल पाटील, राहुल सानप, रवि राठोड, मनोज बागुल, महेश मराठे, तुषार पाटील, श्रीशैल जाधव, सागर शिर्के, योगेश जगताप, किशोर पाटील आदींच्या पथकाने केली.