धुळ्यात ड्रोनद्वारे दारू अड्ड्यावर कारवाई

0

महापालिका आयुक्तांच्या पुढाकाराने राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाले दोन ड्रोन कॅमेरे

धुळे- महापालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले असतानाच अवैध प्रकारांना पायबंद घालण्यासाठी प्रशासनाने धडक मोहिम सुरू केली आहे. महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग व भरारी पथकाला ड्रोन कॅमेरा दिल्यानंतर गुरूवारी चितोड येथील दारू अड्ड्यावर कारवाई करण्यात आली तसेच अन्य एका ठिकाणीही कारवाई झाली. दरम्यान, ड्रोनद्वारे अवैधरीत्या दारूचा पुरवठा व विक्री करणार्‍यांचा शोध घेण्यात येणार असून त्याद्वारे आता कारवाईला जोर येणार आहे.

Copy