धुळ्यात गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुस जप्त : कल्याण-ठाण्यातील सात संशयीतांना अटक

मोहाडी पोलिसांची वाहन तपासणीदरम्यान कामगिरी : आरोपींना एका दिवसाची पोलीस कोठडी

धुळे : जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने वाहनांची तपासणी करताना इनोव्हा वाहनातील व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर पोलिसांनी वाहनाची झडल्यानंतर त्यात गावठी कट्टा व तीन जिवंत काडतूस आढळले. या प्रकरणी कल्याणसह ठाण्यातील सात संशयीतांविरोधात धुळ्यातील मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. रविवार, 3 रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल
शिरपूरकडे नाशिकच्या दिशेने जाणारी इनोव्हा (एम.एच.05 डी.क्यू.1010) जात असताना त्यातील प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर वाहनाची झडती घेण्यात आली असता त्यात एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस आढळल्याने ते जप्त करण्यात आले. या प्रकरणी मोहाडी पोलिसात सुनील गंगाराम धूमाळ (45, मानीवली, घोटसई रोड, ता.कल्याण, जि.ठाणे), सुरज सीताराम ताम्हाणे (27, बेलकरपाडा, म्हसकळ, टिटवाळा, ता.कल्याण, जि.ठाणे), कल्पेश बाळू पडवळ (33, शेनवे, ता.शहापूर, जि.ठाणे), परेश हरीश्‍चंद्र तरे (29, गणपती मंदिराजवळ, टिटवाळा, ता.कल्याण, जि.ठाणे), भालचंद्र हनुमान पाटील (37, ए-92, तुकाराम स्मृती, गायकवाड वाडी, महात्मा फुले रोड, डोंबिवली, पश्‍चिम, जि.ठाणे), करण देविदास पाटील (25, म्हारळगाव, वरप, ता.कल्याण, जि.ठाणे), राम रोहिदास राऊत (42, कांबा, वरप, कल्याण, जि.ठाणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई धुळे अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक दिनकर पिंगळे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एम.आय.मिर्झा, आर.आर.सूर्यवंशी, शाम निकम, हवालदार प्रभाकर ब्राह्मणे, हवालदार शाम काळे, हवालदार संदीप थोरात, नाईक बाबूलाल माळी, कॉन्स्टेबल राजेश हिरे, कॉन्स्टेबल राहुल गुंजाळ, धीरज गवते, सुनील वळवी आदींच्या पथकाने केली.

Copy