धुळे जिल्ह्यात कोरोनाचे अजून पाच रुग्ण

0

शिरपूर(प्रतिनिधी) : धुळे शहरातील ११ जणांच्या कोरोना तपासणी अहवालात ५ जणांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने धुळे शहरात खळबळ उडाली आहे.त्यात शिंदखेडा तालुक्यातील एका महिलेचा समावेश असल्याने कोरोनाने शिंदखेडा तालुक्यातील प्रवेश केला आहे.आज दुपारीच एका ५७ वर्षीय मृत व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता व आत्ता पुन्हा ५ जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोना बाधितांचा आकडा आज अचानक वाढल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे चांगलेच धाबे दणाणले आहे.आतापर्यंत धुळे जिल्ह्यात साक्री व धुळे शहरात दोघाचा मृत्यू झाला आहे तर ६ रुग्ण उपचार घेत आहेत त्यामुळे धुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ८ वर पोहोचला.

Copy