धुळ्यात आमदारांची पत्नी सुरक्षित नाही : गुंडांच्या मागे सत्ताधारी सर्वसामान्य महिलांचे काय? : आमदार गोटे यांची पत्रकार परिषद

0

संशयित आरोपी विनोद थोरात याची मंत्र्यांशी संबंध दर्शविणारी ऑडीओ क्लीप : आमदार अनिल गोटे यांनी माध्यमांना केली सादर

धुळे- धुळ्यात आमदारांची पत्नी सुरक्षित नाही. येथील गुंडांना मंत्र्यांचा आणि सत्ताधार्यांचे सुरक्षाकवच मिळत आहे. त्यामुळे शहरातील सर्वसामान्य महिला सुरक्षित आहेत काय, असा सवाल उपस्थित करीत सोमवारी सकाळी आमदारर गोटे यांनी पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका विषद केली. यावेळी त्यांनी दोन पोलिस कर्मचार्‍यांमधील संवादाची ऑडीओ क्लीप पत्रकारांना ऐकविली. आमदार अनिल गोटे यांनी पत्नी हेमलता गोटे यांच्या बद्दल अपमानजनक मेसेज व्हायरल करून त्यांची बदनामी करणारा व विनयभंगाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी विनोद थोरात याचे मंत्री गिरीष महाजन, केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ.सुभाष भामरे आणि मंत्री जयकुमार रावल यांच्याशी संबंध दर्शविणारी ऑडीओ क्लीप आमदार गोटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रतिनिधीना सोपविली. दोन पोलिस कर्मचार्‍यांमधील हा संवाद आहे. विनोद थोरात याला जेव्हा चाळीसगाव येथून अटक करण्यात होते. तेव्हाचा हा संवाद आहे. एक पोलिस कर्मचारी हा धुळ्यातून तर दुसरा पोलिस कर्मचारी हा चाळीसगाव येथून थोरात याला अटक केल्यानंतर माहिती देत आहे.

सोशल मिडीयावर टाकला होता बदनामीकारक मजकूर
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, विनोद थोरात याने दहा दिवसांपूर्वी शिवकुटीया हा व्हॉट्सअप ग्रुपवर आमदार अनिल गोटे यांची पत्नी हेमलत गोटे यांची बदनामी करणारा मजकुर व्हायरल केला होता. हेमलता गोटे यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिल्यानंतर विनोद थोरात याच्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर थोरात हा फरार झाला होता. त्याला चाळीसगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेवून अटक केली होती. मोहाडी पोलिस स्टेशनला त्याला ठेवण्यात आले होते. थोरात याला जामीन मिळाला आहे. ही ऑडीओ क्लीपची पार्श्वभूमी असल्याचे आमदार गोटे म्हणाले

आरोपी विनोद थोराला मंत्री महाजनांच्या स्वीय सहाय्यकाचा फोन
विनोद थोरात याला जेव्हा चाळीसगाव येथून अटक करण्यात आली तेव्हा त्याचा फोन सुरु होता. त्याला मंत्री गिरीष महाजन यांच्या स्वीय सहाय्यक यांचा फोन आला होता. मंत्री जयकुमार रावल, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या संपर्कात विनोद थोरात होता, असा संवाद पोलिस कर्मचार्‍यांध्ये सुरु होता. तो ओडीओ क्लीपमध्ये ऐकू येत आहे. विनोद थोरात याला चाळीसगाव येथील त्याचे पाहुण्याच्या घरातून अटक करण्यात आली. त्यावेळी विनोद थोरात पोलिसांना सांगत होता की, मंत्री गिरीष महाजन यांनी माझ्यावर 9 डिसेंबर मतदान, 10 डिसेंबर मतमोजणी आणि 11 डिसेंबरची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे मला जामीन मिळण्यासाठी तीन वकील लावले आहेत, असा ही संवाद या ऑडीओ क्लीप मध्ये ऐकू येत असल्याचे आमदार गोटे म्हणाले. विनोद थोरात याला धुळे येथील मोहाडी पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले होते. त्यावेळी धुळ्यातील भिकन अप्पा वर्‍हाडे, हिरामण गवळी आणि प्रर्दीप कर्पे यांचा देखील फोन आला होता, असे ही संवादात ऐकू येत असल्यो आमदार यांनी सांगून धुळे शहरात आमदारांची पत्नी सुरक्षित नाही, गुंडांना सत्ताधार्‍यांचे पाठबळ मिळत आहे. त्यामुळे शहरातील सर्वसामान्य महिला सुरक्षित राहतील काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.