धुळ्यातील 57 डॉक्टरांसह खाजगी प्रयोग शाळांना नोंदणी रद्द करण्याबाबत महापालिकेची नोटीस

0

डेंग्यूच्या निदानासाठी इलिसा आयजीएम तपासणी न करताच निदान : रॅपीड डायग्नोस्टीक किट वापराला ‘खो’

धुळे- डेंग्यू आजाराच्या निश्चित निदानासाठी इलीसा आयजीएम तपासणी करणे आवश्यक आहे, असे असतांना शहरातील खाजगी व्यावसायीक प्रयोग शाळांमध्ये डेंग्यू आजाराच्या निदानासाठी रॅपीड डायग्नोस्टीक किटचा वापर होत आहे. आरडीके तपासणी फक्त डेंग्यूच्या प्राथमिक चाचणीसाठी केला जाऊ शकतो मात्र शहरातील अनेक डॉक्टर इलीसा आयजीएम तपासणी न करताच रुग्णाला डेंग्यूची लागण झाल्याचे प्रमाणपत्र देत आहेत. त्यामुळे रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे डॉक्टरांनी केवळ आर.डी.के.ने डेंग्यू पॉझिटिव्ह निश्चित निदान करू नये यासाठी धुळे महापालिकेने शहरातील 57 डॉक्टर आणि खाजगी प्रयोग शाळांना नोटीसा बजावल्या आहेत. शहरात सध्या डेंग्यू, मलेरीया, स्वाईन फ्लू यासारख्या रोगांची साथ सुरू आहे. केवळ आरडीकेने एनएसआय पॉझिटीव्ह ताप आलेल्या रुग्णांनास डेंग्यू निश्चित निदान करु नये, असे एप्रिल 2016 च्या परीपत्रकात नमूद आहे. रुग्णाच्या निदाना बाबत वरील शासन निर्देशाचा भंग होत आहे. अपुर्ण केलेल्या निदानामुळे व समुपदेशन न केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. आपण शासन निर्देशाचे पालन करत नसल्याचे आढळुन आल्यामुळे आपल्या विरुध्द बॉम्बे नर्सिगहोम अ‍ॅक्ट 1949 अन्वये आपली रजिष्टर नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे नोटीसीत नमूद आहे.

Copy