धुळ्यातील लाचखोर तलाठ्यासह पंटर एसीबीच्या जाळ्यात

धुळे एसीबीची कारवाई : 15 हजारांची लाच भोवली

धुळे : सातबारा उतार्‍यावर आईचे नाव लावण्यासाठी 15 हजारांची मागणी धुळे तलाठ्याच्या चांगलीच अंगलट आली असून लाच स्वीकारताच धुळे एसीबीच्या पथकाने तलाठ्यासह खाजगी पंटराच्या 1 रोजी मुसक्या आवळल्यानंतर लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. प्रशांत सतीश काकडे असे तलाठ्याचे तर शिरीष शाम कोठावदे अटकेतील पंटराचे नाव आहे. आरोपींना 2 रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना एका दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

लाच घेताच केली अटक
शहरातील एका तक्रारदाराने आईच्या नावे सर्व क्रमांक 449 मधील प्लॉट 30 पैकी 157.99 चौमी क्षेत्र खरेदी केले आहे. खरेदी खतामध्ये आईचे सातबारा उतार्‍याव लावण्यासाठी सूची क्रमांक दोन व खरेदी खत जोडून अर्ज देणयात आला मात्र तलाठी यांनी 15 हजार रुपये लाचेची मागणी केली व ही लाच कोठावदे यांच्याकडे देण्यास बजावले होते. 1 रोजी लाचेची पडताळणी केल्यानंतर गुरुवारी सायंकाळी तहसील कार्यालय परीसरात सापळा रचला. तडजोडीअंती 15 हजार रुपये देण्याचे ठरले. तहसील कार्यालयासमोर असलेल्या एका दुकानात हस्तक शिरीष कोठवदे यांच्यामार्फत लाच स्वीकारताना तलाठी प्रशांत काकडेला अटक करण्यात आली. धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे व सहकार्‍यांनी हा सापळा यशस्वी केला.