धुळ्यातील प्लॅस्टिक विक्रेत्यांची आयुक्तांकडे तक्रार : चौघा विके्रत्यांवर कारवाई

0

धुळे- महापालिकेच्या कार्यक्षेत्रात प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री करणार्‍या दुकानदारांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे तक्रार केली आहे. कंपन्यांकडून रीतसर पिशव्या खरेदी केल्या असून त्यात प्लॅस्टिक नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मनपाच्या पथकाने चार विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली. विक्रेत्यांनी प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय असलेल्या पिशव्या खरेदी केल्याची बिले आयुक्तांना दाखवली मात्र पर्यायी पिशव्यांमध्ये प्लॅस्टिकचा अंश आढळला आहे. शिवाय त्या पिशव्या प्लॅस्टिकसाराख्याच दिसत असल्याने पथकाने कारवाई केली. दरम्यान काही विक्रेत्यांनी आयुक्तांच्या दालनात संबंधित पिशव्या जाळून दाखविल्या असता त्यात प्लॅस्टिकचा अंश असल्याचे स्पष्ट झाले. प्लॅस्टिक पिशव्यांचे उत्पादन करणार्‍या कंपन्यांवरच कारवाई करावी, अशी मागणी विक्रेत्यांनी केली. दरम्यान चार दुकानदारांकडून पथकाने प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल केला.

Copy