धुळ्यातील दिड कोटींचे ब्राऊन शुगर प्रकरण : आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी

भुसावळ : नाशिक आयजींच्या विशेष पथकाने धुळ्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे दिड कोटींचे किंमत असलेली तब्बल 500 ग्रॅम ब्राऊन शुगर शनिवारी रात्री पकडली होती. या प्रकरणी सैय्यद शेरू सैय्यद बुडन (43, पंचशील नगर, भुसावळ) या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. आरोपीला रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यास पाच दिवसांची अर्थात शुक्रवार, 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

ड्रग्ज पुरवठावर पोलिसांच्या रडारवर
धुळे शहरातील हॉटेल रेसीडेन्सी पार्कजवळ एक संशयीत नशेसाठी वापरल्या जाणार्‍या प्रतिबंधीत ब्राऊन शुगरच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती नाशिक आयजींच्या विशेष पथकाला मिळाल्यानंतर पथकाने शनिवार, 9 रोजी सायंकाळी सापळा रचून संशयीत सैय्यद शेरू सैय्यद बुडन (43, पंचशील नगर, भुसावळ) यास अटक केली होती. आरोपीच्या अंग झडतीत तब्बल 500 ग्रॅम ब्राऊन शुगर आढळल्यानंतर त्यास गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. आरोपीला रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, आरोपीने ब्राऊन शुगर नेमकी कुणाकडून आणली व धुळ्यात तिची खरेदी कोण करणार होते शिवाय आरोपीसोबत आणखी कुणाचा सहभाग आहे का? याची खोलवर चौकशी मोहाडी पोलिसांकडून केली जाणार आहे. तपास मोहाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एम.आय.मिर्झा व सहकारी करीत आहेत.

Copy