धुळ्यातील तरुणीचा बिछाण्यावरून पडल्याने मृत्यू

0

धुळे- बिछाण्यावर मोबाइल पाहत असताना अचानक तोल जावून खाली पडल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी देवपूरातील कृष्णा हौसिंग सोसायटीत घडला. निकिता सूर्यवंशी असे मृत तरुणीचे नाव आहे. मृत्यूचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. निकिता सूर्यवंशी (20) ही दुपारच्या वेळी निवांतपणे बेडवर बसून मोबाइल हाताळत होती. यानंतर अचानकपणे तीला भोवळ आल्याने ती खाली कोसळली. दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी हा प्रकार घडला. कुटंबीयांनी तिला अत्यवस्थ अवस्थेत हिरे रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉ. नितीन पवार यांनी तपासणी करुन निकिताला मृत घोषित केले.

Copy