धुळ्यातील एसएसव्हीपीएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मारहाण ; एकाविरूद्ध गुन्हा

0

धुळे- शहरातील एसएसव्हीपीएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हितेंद्र धनसिंग पाटील यांना महाविद्यालयातील एका कर्मचार्‍याने मारहाण करीत आत्महत्या करण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी सकाळी 11 वाजता ही घटना घडली. महाविद्यालयाच्या प्राचार्य कक्षात गुलाबराव व्यंकटराव पाटील यांनी प्रवेश करून प्राचार्य डॉ. पाटील यांना मारहाण करत शिवीगीळ केली. तसेच हाताबुक्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तुमच्या घरी येऊन आत्महत्या करेल, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.