धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांची मुदतपूर्व बदली

0

धुळे –धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांची नागपूर लोहमार्ग विभागात बदली झाल्याची खात्रीशीर माहिती आहे. धुळे महापालिका निवडणुका उंबरठ्यावर असताना माळी यांची अचानक बदली झाल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत. बदली संदर्भातील आदेश अद्याप धुळे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात प्राप्त झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

माळी यांच्या काळात अनेक लाचखोरांवर कारवाई झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले होते. शहरात डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बदली तर झाली नाही ना ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. माळी यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास अद्याप काही महिन्यांचा अवधी शिल्लक असताना मुदतपूर्व बदली झाल्याने नेमके खरे कारण कळू शकले नसल्याने तर्कवितर्क लढवले जात आहे.