धुळे रेल्वे लाईन जवळ दहीवद येथील ईसमाचा मृतदेह

0

चाळीसगाव : तालुक्यातील दहीवद येथील 40 वर्षीय ईसमाचा मृतदेह येथील श्रीकृष्ण कॉलनी भागातील रेल्वे लाईन शेजारी काटेरी झुडुपात विषारी औषध सेवन केलेल्या अवस्थेत मिळुन आला असुन चाळीसगाव शहर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील दहिवद येथील गणेश पुंजु बोरसे (40) यांचा मृतदेह 29 डिसेंबर 2016 रोजी येथील श्रीकृष्ण कॉलनी शेजारील रेल्वे बोगद्याजवळ असलेल्या रेल्वे लाईनजवळ काटेरी झुडुपात मिळुन आला आहे. या ईसमाने विषारी औषध सेवन केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज सुत्रांनी वर्तवला आहे. दरम्यान सदर इसम हा तालुक्यातील दहीवद येथील असल्याने तो चाळीसगाव येथे का आला होता. त्याने विषारी औषध का सेवन केले? असा सवाल उपस्थित होत आहे. याप्रकरणी संदीप रविंद्र साळुंखे (28) रा. चाळीसगाव यांनी खबर दिल्यावरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास हवालदार प्रदिप परदेशी करीत आहेत.