धुळे परीसरात वेगवेगळ्या घटनेत चौघांनी घेतला गळफास

0

धुळे- शहर परीसरात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांनी गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. मृतामध्ये एका वृध्दाचा समावेश आहे. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. शहरातील पारोळा रोड परिसरात असेल्या सॉ मिलच्या मागे राहणारे पृथ्वीराज हरीभाऊ सरोदे (वय. 65) यांनी गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आला. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसर्‍या घटनेत धुळे तालुक्यातील नंदाणे गावातील दादाभाई पावबा महाले-पाटील (38) यांनी राहत्या घरी गळफास घेतला. हा प्रकार काल सोमवारी दुपारी सव्वाबारा वाजता समोर आला. तिसर्‍या घटनेत साक्री तालुक्यातील धाडणे येथील इंदिरा नगरात राहणारे बापू गुमान सोनवणे (40) यांनी शेणपूर गावाच्या शिवारात झाडाला गळफास घेतला. हा प्रकार सकाळी आठ वाजेच्या सुमारास समोर आला. याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर साक्री तालुक्यातील छडवेल गावाच्या शिवारात अण्णा नानू ठाकरे (50) यांनी गाव शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.

Copy