धुळे येथील डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी जळगावात निषेध

0

जळगाव ।12 मार्च रोजी रात्री 11 वा. धुळे सिव्हील हॉस्पिटल येथे कार्यरत असलेेले निवासी ओर्थोपेडिक डॉ.रोहन मामुणकर यांना रुग्णाच्या 30 ते 40 नातेवाईकांनी जबर मारहाण केली. त्याच्यात त्यांचा डावा डोळा निकामी होण्याची भीती आहे. तरी आम्ही, जळगाव डिस्ट्रिक्ट ओर्थोपेडिक असोसिएशनतर्फे निषेध व्यक्त करत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी निंबाळकर यांना देण्यात आले.

वैद्यकिय अधिकार्‍यांवर घटना वारंवार, प्रत्येक जिल्ह्यात घडत असून डॉ.मध्ये भीतीदायक वातावरण असून डॉ.आपली रुग्ण सेवा पूर्ण क्षमतेने करु शकणार नाही व त्यामुळे अशा घटना पुन्हा-पुन्हा घडू शकतात. त्यामुळे रुग्ण व डॉक्टरांचे संबंध खराब होतात. डॉक्टरांना मुक्त वातावरण नसेल तर चांगल्यात चांगली सेवा देण्यात अडथळे येतात. सुप्रिम कोर्टाने आदेश दिल्याप्रमाणे रुग्णाबरोबर 2 पेक्षा जास्त नातेवाईक नसावेत, असे निर्देश दिले असले तरी ते कोणत्याच ठिकाणी अंमलात आणले जात नाहीत. तशी सुरक्षा व्यवस्थाही पुरविली जात नाही. तरी कोर्टाचे आदेश अंमलात आणण्यात यावेत, तसेच डॉक्टरांना व रुग्णालयांना पोलिसांतर्फे संरक्षण देण्यात यावे. जेणेकरुन रुग्ण व नातेवाईकांचे डॉक्टरांशी होणारे वाद व अशा घटना टाळता येतील. आपण योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली.