धुळे मनपाला खड्डे दाखविणारे आंदोलन

0

धुळे । शहरातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम महापालिकेकडे निवेदने देवून व महासभेत मागणी करुनही होत नसल्याने देवपूरच्या नगरसेविका प्रतिभा चौधरी यांनी खड्ड्याभोवती रांगोळी काढून खड्ड्यांमध्ये बसत रहिवाशांसह संबंधित अधिकार्‍यांचे लक्ष या समस्येकडे वेधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सहकार्‍यांनी रस्त्यावरील खड्ड्यांना फुले अर्पण करुन महापालिकेला जाग यावी अशी प्रार्थनाही केली.