धुळे बसस्थानकातून मुलीसह वडील बेपत्ता

0

धुळे – शहरातील चितोड रोडवरील राऊळवाडीत राहणारे लक्ष्मण अभिमान कोळी (24) हे मुलगी कल्याणी लक्ष्मण कोळी (2) हिच्यासह शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घराबाहेर पडले. दोंडाईचा येथे जात असल्याचे कारण त्यांनी सांगितले होते मात्र, ते बसस्थानकातून कुठेतरी निघून गेले. दोंडाईचा येथे नातेवाईकांकडेही पोहोचले नाही. याप्रकरणी अभिमान मंगा कोळी यांनी दिलेल्या माहितीवरून शहर पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली.

Copy