धुळे पोलीस अधीक्षकपदी प्रवीण पाटील तर पी.आर.पाटील नंदुरबारचे नवे अधीक्षक

भुसावळ : राज्यातील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, पोलिस उपायुक्त दर्जाच्या 31 अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश राज्याच्या गृह विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड यांनी काढले आहेत. त्यात धुळ्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांची नागपूर शहर पोलीस उपायुक्तपदी बदली झाली असून त्यांच्या जागी नवी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीण सी.पाटील बदलून येत आहेत. नंदुरबारचे पोलीस अधीक्षक महेंद्र कमलाकर पंडित यांची मुंबई शहर पोलीस आयुक्तपदी बदली झाली असून त्यांच्या जागी कोल्हापूर येथील नागरी हक्क संरक्षण पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील बदलून येत आहेत.

फैजपूर उपविभागाच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी कुणाल सोनावणे

राज्यातील पोलीस उपअधीक्षक/सहा.पोलीस आयुक्त दर्जाच्या एकूण 92 अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश राज्याचे गृह विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड यांनी गुरुवार, 9 सप्टेंबर रोजी काढले आहेत. त्यात भामरागड जि.गडचिरोली उपविभागीय अधिकारी कुणाल शंकर सोनावणे यांची फैजपूर विभागाच्या पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी चोपडे
राज्यातील पोलीस अधीक्षक/पोलीस उपायुक्त दर्जाच्या 54 अधिकार्‍यांच्याही बदल्या झाली असून त्यात नाशिक राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त रमेश चोपडे यांची चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

Copy