धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड 19 नियंत्रण कक्ष कार्यान्वित

0

धुळे:राज्यात कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत आहे. त्याच्या प्रतिबंधासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा कोविड 19 नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गायकवाड यांनी दिली.

परराज्यातून किंवा अन्य जिल्ह्यातून विषाणूबाधित व्यक्ती जिल्ह्यात प्रवेश करण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. अशा व्यक्तींकडून जिल्ह्यात अजाणतेपणी कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूच्या प्रादूर्भाव, प्रसार रोखण्यासाठी व माहिती व मार्गदर्शनासाठी महसूल विभाग, आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभागातील (दिव्यांग नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी)
अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. कोरोना विषाणूबाबत माहिती मिळविण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी कोविड 19, नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे दूरध्वनी : 02562- 288066 या क्रमांकावर संपर्क साधावा. या कक्षात सकाळी आठपासून रात्री आठ वाजेपर्यंत एक वैद्यकीय अधिकारी उपस्थित असतील. ते याविषयी अधिक माहिती देतील, असेही निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांनी सांगितले.

Copy