धुलीपाडा येथे रोजगार हमी योजनेच्या कामाचे शुभारंभ

0

नवापूर: तालुक्यातील धुलीपाडा येथे रोजगार हमी योजना अंतर्गत गावतलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान जि. प. सदस्य भरत गावीत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी धुलीपाडा पं.स. सदस्य राजेश गावीत, सरपंच उमेश गावीत,माजी सरपंच प्रकाश गावीत,ग्रा म सदस्य गणेश गावीत,शिवदास गावीत,सुमन गावीत,देवराम गावीत,गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर,विस्तार अधिकारी किरण गावीत,ग्रामसेवक ज्ञानेश्वर कावळे,आदी उपस्थित होते.
धुलीपाडा गाव अंतर्गत एक तलाव आहे.या तलावात ८ महिने पाणी असते.या तलावात जास्त प्रमाणात गाळ असल्यामुळे पाणी जास्त काळ थांबत नाही.माञ यावर्षी या तलावाच्या गाळ काढल्याने जास्त कालावधीने पाणी थांबणार आहे.यामुळे गावातील बोरवेल पाणी राहण्यास मदत होणार आहे.तसेच शेतीला पण उपयुक्त ठरणार आहे.धुलीपाडा गाव अंतर्गत तलावात गाळ काढण्यासाठी १०४ मजुर काम करीत आहे.

Copy