धुलिवंदनानिमित्त जिल्ह्यात मद्य विक्री बंद

0

जळगाव । सण उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था टिकविणे अत्यंत जिकीरीची असते. या प्रसंगी शांतता व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी पोलीस दलातर्फे विविध उपाययोजना करण्यात येतात. सण उत्सवाप्रसंगी सामाजिक शांतता भंग होऊन तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. त्यादृष्टीने होळी सणानिमित्त दारु विक्री बंद करण्यात येणार आहे. सोमवारी 13 रोजी धुलिवंदनाचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्ह्यातील सर्व मद्य विक्री करणारे दुकान बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनातर्फे तसे आदेश देण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, नगरपंचायत हद्दीतील मद्य विक्री, परमिटरुम, बिअर शॉपी, ताडीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. अति संवेदनशिल भागात पोलीस दलाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. तसेच होळी व अन्य सणांच्या पार्श्‍वभूमिवर जिल्ह्यात मनाई आदेश देखील जारी करण्यात आले आहे. 23 मार्चपर्यत आदेशाचा भंग करणार्‍याविरुध्द कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.