धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट टाकणार्‍यांवर व्हावी कारवाई

0

भुसावळात प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांना निवेदन

भुसावळ : इन्स्टाग्राम व सोशल मिडीयाद्वारे एका समाजाच्या धर्म गुरूंबाबत अश्‍लील छायाचित्र व व्हिडिओ टाकणार्‍यावर कठोर कारवाई करावी, न्युज 18 इंडिया या चॅनलचे अँकर अमीश देवगण यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा व या चॅनलवर कायमस्वरूपी बंदी घालावी तसेच सर्व चॅनलवर कुठल्याही धार्मिक डिबेटवर बंदी घालण्यात यावी, अशा मागणी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
निवेदन देताना माजी नगरसेवक शेख पापा शेख कालू, धर्मगुरु मोहंमद कमरूद्दीन रजवी, मोहंमद अखलाक, दशजवी, सैय्यद अख्तर आली रजवी, सैय्यद नुरआलम अशरफी, हाफीज रईस शाह नक्शबंदी, शफीउज्जम शाह, शेख इमरान शेख पापा, असलम मासुम शाह, मुश्ताक शेख अहमद, जावेद शेख अहमद, घमा दगडू पिंजारी, फारूक सुभान शाह, शेख जाकीर जफर, अशफाक अशरफ हुसेन, शकील गुलाब शाह, एजाज मुस्तफा खान, आशिक अली अ.सलाम, याकुब महेबुब गवळी, अन्वर नुर मोहंमद उपस्थित होते.

Copy