Private Advt

धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट टाकली : एकाविरोधात गुन्हा

जळगाव : सोशल मिडीयावर धार्मीक भावना दुखावणारी पोस्ट टाकल्याप्रकरणी एकाविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सोशल मिडीयावरील व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर समाजात तेढ निर्माण होईल अशा पद्धतीची धार्मिक भावना दुखाविणारी पोस्ट व्हायरल केलने धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने जिल्हापेठ पोलिसात एक तरुणाच्या तक्रारीनंतर पोस्ट व्हायरल करणारविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास निलेश भावसार करीत आहे.