Private Advt

धार्मिक तेढ निर्माण करणारे स्टेटस टाकले : किनगावातील युवकावर कारवाई

यावल : तालुक्यातील किनगाव येथील 21 वर्षीय युवकाने व्हॉट्सअपवर धार्मिक भावना दुखावणारे स्टेटस टाकल्याने यावल पोलिसांनी या युवकास ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली. यावल तालुक्यातील किनगाव येथील उमेश पंढरीनाथ कोळी या युवकाने त्याचे व्हॉटसअ‍ॅपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याची माहिती यावल पोलिसांना कळालयानंतर यावल पोलिसांनी तरुणास ताब्यात घेत त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई कली. यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार यांनी तातडीने किनगाव येथे जात त्या तरुणास ताब्यात घेत त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. धार्मिक भावना दुखावतील अश्या स्वरूपाचा पोस्ट कुणीही व्हायरल करू नये अथवा स्टेटसला ठेवू नये, असे आवाहन यावल पोलिसांनी केले आहे.