Private Advt

धानोरा गावातील अल्पवयीन मुलीचे अपहरण

जळगाव : तालुक्यातील धानोरा बुद्रूक गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी एका तरुणाविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अपहरण केल्या प्रकरणी गुन्हा
धानोरा बुद्रूक येथे अल्पवयीन मुलगी तिच्या घरी असतांना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तिला काही तरी फूस लावून तिचे अपहरण दादा पांडुरंग पारधी (चोपडा) या तरुणाने केल्याचा आरोप आहे. याबाबत अल्पवयीन मुलीचे वडिलांनी तालुका पोलिसात तक्रार दिल्यानंतर संशयीत दादा पांडुरंग पारधी (चोपडा) या तरुणाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहेत.