Private Advt

धर्मरथ फाउंडेशनतर्फे समाजभुषणांचा करण्यात आला सन्मान

समाजकार्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सन्मान

जळगाव – धर्मरथ फाउंडेशन जळगाव तर्फे जिल्हास्तरीय पुरस्कार आणि शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यातील क्रीडा सांस्कृतिक व परंपरेचा वारसा तसेच आपआपल्या क्षेत्रातील जडणघडणी मध्ये प्रचार प्रसार करून अग्रेसर असण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी शिवजयंतीचे औचित्य साधुन पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी जिल्हापरिषद अध्यक्ष रंजना पाटील, उपमहापौर कुलभूषण पाटील, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे.राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर,केंद्रीय वखार महामंडळ अधीक्षक प्रशांत तायडे, क्रीडा अधिकारी सुजाता गुलाने यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

योगेश साळुंखे, गणेश पाटील, सुनील पाटील, साजीद पठाण, भूषण परशुराम रायगडे, संदेश हिरामण महानुभव , विलास पाटील, महिंद्रा पाटील, दिपकचौधरी, अंजली नाईक, अमिता निकम, सोनाली सोनवणे, विजयशितोळे, किशोर नेवे, प्रीती गोपाळ मिस्तरी , गौरी महाजन , सन्मुख महाजन , राहुल सूर्यवंशी, भारती काळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उल्हास ठाकरे व आभार प्रदर्शन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष भितांडे, राजेश पाटील, साजीद पठाण,वेदांत नाईक, तन्मय राणे, मयूर देशमुख, सागर कुटुंबळे, रोहित कुटुंबळे यांनी परिश्रम घेतले.