धर्मगुरू रामराव महाराजांना अखेरचा निरोप; अलोट गर्दी

0

वाशीम: बंजारा समाजाचे धर्मगुरू संत डॉ.रामराव महाराजांचे शुक्रवारी रात्री ११ वाजता निधन झाले होते. आज रविवारी वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहे. तिरंग्यात असलेल्या त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होत आहे. संपूर्ण देशातून बंजारा समाज बांधव याठिकाणी उपस्थित आहे. भाविकांची गर्दी मोठी असल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे. वनमंत्री संजय राठोड हे याठिकाणी उपस्थित आहे.

Copy