धरणगाव महाविद्यालयाचे होळ येथे विशेष हिवाळी शिबीर उत्साहात

0

धरणगांव : येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबीर होळ येथे 15 ते 21 डिसेंबर 2016 या सात दिवसाचे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.आर. हायस्कूल सोसा.चे अध्यक्ष डॉ. अरूण कुलकर्णी तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थचे उपाध्यक्ष व्ही.टी.गालापुरे, संस्थेचे सचिव डॉ. मिलींदजी डहाळे, संचालक अजयशेठ पगारिया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.टी.एस. बिराजदार, उपप्राचार्य एच.एम. मेहतर, पर्यवेक्षक प्रा. आर.आर. पाटील, कला विभाग प्रमुख प्रा.बी.एल.खोंडे, होळच्या सरपंचा अनिता पाटील, उपसरपंच गुलाबसिंग पाटील, सदस्य महेंद्रसिंग पाटील, कार्यक्रमाचे उद्घाटक रमेश पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष समिती होळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

राष्ट्रीय सेवा योजनाच्या उपक्रमातून विविध योजना राबविणार
शिबीराचे उद्घाटन रमेश पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या शिबीरात 50 स्वयंसेवक सहभागी असून स्वच्छता, आरोग्य, शिक्षण यासारख्या विषयांवर गावात जनजागृती करण्यात येणार असून या कामी गावकर्‍यांचे मोलाचे योगदान व सहकार्य मिळत आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे हक्काचे व्यासपीठ असून विद्यार्थी आपले विचार खुल्या मनाने मांडून जीवनात आपल्या आचारा-विचारा मध्ये आमुलाग्र बदल हा घडत असतो म्हणून शासनाच्या वतीने महाविद्यालयात एक चांगला उपक्रम आम्ही राबवित असतो असे उद्गार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बिराजदार यांनी आपल्या अतिथी भाषणात विचार व्यक्त केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरूणजी कुलकर्णी यांनी राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे विद्यार्थी व गावकरी यांचे या शिबीराच्या माध्यमातून ऋणानुबंधन जुळत असतात. विद्यार्थ्यांमध्ये देशसेवा व सामाजिक बांधीलकी याविषयी आपुलकी निर्माण होते.

यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. विश्वजीत बिराजदार यांनी मांडले तर आभार कविता चौधरी यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. जे.एन. तायडे प्रयत्न करीत आहेत. कार्यक्रमाला प्रा. ए.आर. पाटील, प्रा. राखी पाटील, प्रा. नेत्रा पवार, प्रा. उमेश पाटील, प्रा. एन.डी. सोनवणे, लक्ष्मण महाजन, कैलास महाजन, हेमंत सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.