धरणगाव नगरपालिकेत दोन्ही जागा शिवसेनेला

0

धरणगाव : येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुरेखा विजय महाजन यांची निवड झाली असून स्विकृत नगरसेवकपदी माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी व भाजपाचे अ‍ॅड. राजेंद्र येवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उपनगराध्यक्ष आणि स्विकृत नगरसेवकांची निवड झाल्यानंतर सर्व नगरसेवकांनी भगवा फेटा परिधान करुण विजयी मिरवणूक काढण्यात आली छत्रपति शिवजी महाराज महात्मा फुले. शास्री पुतळा याना माल्यार्पण करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ नगर आध्यक्ष सलीम भाई पटेल तालुका प्रमुख गजानन नाना राजेंद्र महाजन राजेंद्र चौधरी व सर्व शिवसैनिक युवसेनिक विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सुरेश नाना चौधरी याची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली.