धरणगाव कनिष्ठ महाविद्यालयाचा रासेयो शिबीराचे समारोप

0

धरणगाव : येथील पी.आर.हायस्कूल सोसा. संचलित कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर दत्तक गांव कल्याणे होळ येथे नुकतेच पार पडले. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरूण कुलकर्णी तर प्रमुख अतिथी म्हणून कल्याणे होळ तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रमेश पाटील संस्थेचे उपाध्यक्ष व्ही.टी. गालापुरे, संस्थेचे सचिव डॉ. मिलींदजी डहाळे, संचालक अजयशेठ पगारिया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टि.एस. बिराजदार, उपप्राचार्य प्रा. एच.एम.मेहतर, पर्यवेक्षक आर.आर.पाटील, कला विभाग प्रमुख प्रा. बी.एल.खोंडे हे उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर सरपंच अनिता पाटील, उपसरपंच गुलाबसिंग पाटील, ग्रामपंचायत सदस्य महेंद्रसिंग पाटील, पो.पा. उखर्डू पाटील, ग्रामसेवक संदिप महाजन, तलाठी विरेंद्र सोनकामंळे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, कार्यक्रम अधिकारी एम.एस. कांडेलकर उपस्थित होते.

हिवाळी शिबीर यशस्वितेसाठी यांचे परीश्रम
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे रमेश पाटील यांनी शिबीरातून ग्रामसेवेबरोबरच विद्यार्थ्यांचा सुप्तकलागुणांचा विकास होतो असे उद्गार काढले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टि.एस. बिराजदार यांनी संस्कार विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व व कलागुणांना सर्वांगिण विकास घडवण्यास मदत होते. विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त लागते. असे सांगितले. तर अध्यक्षीय भाषणात डॉ. अरूणजी कुलकर्णी यांनी श्रमसंस्कार शिबीर म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक भौतिक परवनी असते असे सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालयातील व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधु-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महिला कार्यक्रम अधिकारी श्रीमती कविता चौधरी यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्थाविक सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. व्हि.टी. बिराजदार यांनी केले. आभार सहाय्यक अधिकारी प्रा. जे.एम. तायडे यांनी मांडले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.