धरणगावात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

धरणगाव : शहरातील सोनवड रोडच्या डाव्या बाजूला एका शेतातील विहिरीत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. अनोळखीची अद्याप ओळख पटलेली नाही.

ओळख पटवण्याचे आवाहन
शहरातील सोनवड रोडच्या डाव्या बाजूला एका शेतातील विहिरीत अनोळखी इसमाचा मृतदेह असल्याची माहिती शेतमालक विहिरीवर गेल्यानंतर उघड झाली. धरणगाव पोलिस ठाण्यात तत्काळ घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाच्या उजव्या हातावर आकाश नाव गोंदण केलेले आहे तर अंगात चौकडीचा निळा शर्ट व काळी पॅन्ट आहे. अनोळखीची ओळख पटविण्याचे आवाहन धरणगाव पोलिसांनी केले आहे.