धनदाई महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन

0

अमळनेर : देशपातळीवरील व महाराष्ट्राचा महानेता शरद पवार यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त येथील धनदाई महाविद्यालयात तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी गुरूवार 15 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता निबंध स्पर्धा ‘शरद पवारांची यशस्वी गाथा’ या विषयावर होणार आहे. तर शनिवार 17 डिसेंबरला खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ‘शरद पवार यांची अर्धशतकीय राजकीय यशोगाथा’ या विषयावर करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला 7 मिनिटांचा अवधी दिला जाणार आहे. यासाठी इच्छुकांनी धनदाई माता एज्युकेशन सोसा अथवा जय योगेश्वर ज्युनियर कॉलेजच्या कार्यालयात नोंदवायची आहे. त्यावेळी सविस्तर माहिती दिली जाईल, असे आवाहन आयोजक राष्ट्रवादी महिला प्रदेश सरचिटणीस प्रा.रंजना देशमुख तसेच राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेश सचिव प्रा.डी.डी. पाटील, व.ता. पाटील यांनी केले आहे.