धनंजय मुंडेंना मोठा दिलासा: बलात्काराची तक्रार घेतली मागे

0

मुंबई: सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचेआरोप करण्यात येऊन पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. या तक्रारीनंतर धनंजय मुंडे यांचे राजकीय करियर धोक्यात आल्याचे चिन्ह दिसत होते. आरोपात तथ्य आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले होते. दरम्यान आता धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या महिलेने धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार केली होती, तिने आता तक्रार मागे घेतली आहे. घरगुती वाद झाल्याने तक्रार केली होती झ मात्र याला राजकीय वळण लागल्याने तक्रार मागे घेत असल्याचे महिलेने निवेदनात म्हटले आहे.

धनंजय मुंडे हे करुणा शर्मा या महिलेसोबत विवाहबाह्य संबंधात होते. धनंजय मुंडे यांच्यापासून महिलेला दोन मुलं देखील आहेत. या मुलांना धनंजय मुंडे यांनी त्यांचे नाव दिले असून संपूर्ण जबाबदारी घेतली असल्याचे कबूल केले आहे.

भाजपने धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केले होते. मात्र आता तक्रार करणाऱ्या महिनेलेच तक्रार मागे घेतल्याने मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Copy