Private Advt

धडगाव बसस्थानकात युवकाची गळफास घेवून आत्महत्या

धडगाव : प्रेम प्रकरणातून तरुणाने धडगाव बस स्थानकात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मयताची अद्याप ओळख पटलेली नाही. धडगाव बाजारपेठेतील वर्दळीचे ठिकाण असलेल्या बसस्थानकात शुक्रवारी रात्रीच्या वेळी अनोळखी युवकाने शेडमधील लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.

प्रेम प्रकरणातून आत्महत्या
आत्महत्या करण्याच्या आधी सदर तरूणाने बसस्थानकातील फरशीवर खडूने नोट लिहून मी एका मुलीशी प्रेम करत आहे व प्रेम प्रकरणात धोका मिळाला आहे, दोन दिवस मी उपाशी राहिला,े फक्त पाणी प्यायलो आय लव यू अशा आशयाची नोट लिहिलेली आढळल्याने प्रथम दर्शनी सदर तरूणाने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. याबाबत धडगाव पोलिस अधिक तपास करीत असून सदर तरुणांबद्दल अधिक माहिती असल्यास धडगाव पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.