धक्कादायक: हाथरसच्या निमित्ताने जातीय दंगलीसाठी परदेशातून मोठी रसद

0

लखनऊ : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका तरुणीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. यावरून संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. विरोधकांनी यावरून भाजप आणि योगी सरकारला लक्ष केले आहे. देशभरात आंदोलने होत आहे. दरम्यान हाथरस प्रकरणाच्या निमित्ताने जातीय दंगली पसरवण्यासाठी मॉरिशसमधून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाजवळ (पीएफआय) ५० कोटी आले होते, असा धक्कादायक खुलासा ईडीच्या अहवालातून करण्यात आला आहे. हा सर्व निधी १०० कोटींपेक्षा जास्त होता, असा दावा देखील ईडीने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

दरम्यान, हाथरस घटनेनंतर जातीय दंगली पसरवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून ४ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना मेरठ येथून अटक करण्यात आली आहे. हे चौघेही दिल्लीहून हाथरसच्या दिशेने जात होते. यापैकी एक जामियाचा विद्यार्थीही आहे. युपीमध्ये दंगलीचा कट रचणारा पीएफआयचा मास्टरमाइंड आहे, असल्याचा पोलिसांनी केला आरोप आहे. यापूर्वी, यूपी पोलिसांनीही वेबसाइटच्या माध्यमातून दंगलीच्या कट रचल्याचा दावा केला आहे.

हाथरस पीडितेला न्याय मिळावा, यासाठी तयार करण्यात आलेल्या या वेबसाइटवर बर्‍याच आक्षेपार्ह मजकूर अपलोड करण्यात आला होता. ईडीने हाथरसमध्ये दंगलीचा कट रचण्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल केला आहे. ईडीने केलेल्या प्राथमिक तपासणीत असे दिसून आले आहे, की यूपीमध्ये जातीय दंगली परवण्यासाठी १०० कोटींपेक्षा जास्त रुपयांचा निधी देण्यात आला होता.

Copy