धक्कादायक ! रात्रीच्या वेळी घरात घुसून अज्ञाताकडून डॉक्टरावर प्राणघातक हल्ला

घडलेल्या घटनेने शिरपूर शहरात खळबळ

शिरपूर – रात्रीच्या वेळी घरात घुसून एका अज्ञात व्यक्तीने डॉक्टरावर तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी शहरात घडली. रात्री सव्वानऊच्या सुमारास करवंद नाक्यावरील हुलसिंग नगरमध्ये हि धक्कादायक घटना घडली.डॉ. आत्माराम भगवान लोखंडे वय ६५ असे हल्ला झालेल्या डॉक्टरांचे नाव असून ते सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी आहेत.

डॉ.आत्माराम भगवान लोखंडे वय ६५ हे सेवानिवृत्त झाले असून ते शहरातील करवंद नाका परिसरात हुलसिंग नगरमध्ये राहतात.४ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास दरवाजा ठोठावल्याचा आवाज आल्याने डॉ.लोखंडे यांनी दरवाजा उघडला. यावेळी एका संशयिताने अचानक डॉ.आत्माराम भगवान लोखंडे यांच्यावर तिक्ष्ण हत्याराने हल्ला केला त्यात डॉक्टरांच्या छातीवर आणि डोक्यावर गंभीर दुखापत झाली. संशयितांने डॉक्टरांवर हल्ला केल्याचे लक्षात त्यांच्या पत्नीने घराबाहेर येऊन आरडाओरड केल्याने हल्लेखोर घटनास्थळा वरून पसार झाला. हल्ल्यानंतर नागरिकांनी धाव घेत डॉ.लोखंडे यांनी जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्यांना धुळे येथे हलविण्यात आले आहे.

घटनेची माहीती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील,पीएसआय सागर आहेर. पीएसआय किरण बा-हे, पीएसआय निळकंठ सोनवणे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अद्याप या घटनेचे कारण समजू शकलेले नाही. पोलिसांकडून उशिरापर्यंत कार्यवाही सुरू होती.