धक्कादायक ! : भुसावळात एसआरपीएफच्या 20 जवानांना कोरोनाची बाधा

0

भुसावळ शहरासह तालुक्यात एकाच दिवशी आढळले 44 पॉझीटीव्ह

भुसावळ (गणेश वाघ) : शहरासह तालुक्यात कोरोनाचा फैलाव कायम असून गुरुवारी तब्बल 44 पॉझीटीव्ह रुग्ण आढळल्याने शहरात खळबळ उडाली. विशेष म्हणजे बाधीतांमध्ये 20 एसआरपीएफ जवांनासह शहरातील अन्य 13 रुग्णांसह भुसावळ तालुक्यातील 11 रुग्णांचा समावेश आहे.

शहरातील या भागात आढळले बाधीत रुग्
शहरातील रामायण नगरातील 32 वर्षीय पुरुष, न्यू सतारा भागातील 50 वर्षीय पुरुष, गरुड प्लॉटमधील अनुक्रमे 40 व 12 वर्षीय पुरुष, 15 बंगला भागातील 29 वर्षीय महिला, गोदावरी नगरातील एकाच कुटूंबातील चार, गोकूळ नगरातील 21 वर्षीय पुरुष, दत्तनगरातील 49 वर्षीय महिला, मामाजी टॉकीज रोड परीसरातील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

Copy