धक्कादायक ! भरदिवसा आमदारांवर गोळीबार

पिंपरी चिंचवड – पुणे जिल्ह्यातील  पिंपरी चिंचवड येथे भरदिवसा राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या धक्कादायक घटनेत तान्त्यांहाजी पवार यांनी आमदारांवर 3 राऊंड फायर केले. सुदैवाने अण्णा बनसोडे थोडक्यात बचावले आहेत.

पिंपरी चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांचं कार्यालय आहे. याच परिसरात दुपारी १ वाजेच्या सुमारास तानाजी पवार नावाच्या इसमाने त्यांच्यावर हल्ला केला. तानाजी पवारने पिस्तुलीतून अण्णा बनसोडे यांच्यावर 3 राऊंड फायर केल्याची माहिती मिळत आहे. या गोळीबारातून अण्णा बनसोडे हे थोडक्यात बचावले आहेत.