धक्कादायक: बस-ट्रकच्या अपघात; १३ जण ठार

0

मदारपूर: चालकाचे भरधाव बसवरील नियंत्रण सुटल्याने बस-ट्रक भीषण अपघात झाला. यात १३ जण जागीच ठार झाले आहे तर चार जण जखमी झाले आहे. आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील मदारपूर गावाजवळ आज रविवारी १४ रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

मिनी बसमधून चित्तूर जिल्ह्याकडून हैदराबादच्या दिशेने जात होता. बसमधील सर्वजण राजस्थानातील अजमेरला जात होते होते. दरम्यान, पहाटे चार वाजताच्या सुमारास कर्नूल जिल्ह्यातील वेलदूर्ती हद्दीत असलेल्या मदरापूर गावाजवळ बसने विरुद्ध दिशेकडून येत असलेल्या ट्रकला धडक दिली. बस आणि ट्रकचा वेग प्रचंड असल्याने या भयंकर अपघातात १३ जण जागीच ठार झाले, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात मरण पावलेल्यांमध्ये मृतांमध्ये महिला आणि बालकांचाही समावेश आहे. अपघातात मरण पावलेल्यांविषयी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी दुःख व्यक्त केले आहे. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने वैद्यकीय उपचार व त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

अपघातात मरण पावलेल्यांमध्ये मृतांमध्ये महिला आणि बालकांचाही समावेश आहे. अपघातात मरण पावलेल्यांविषयी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने वैद्यकीय उपचार व त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

 

 

Copy