धक्कादायक; बलात्काराच्या गुन्ह्यातुन सुटलेल्या कैद्याकडून सावत्र मुलीवर बलात्कार

0

पिंपरी:- मोठ्या मुलीवर बलात्कार केल्याने शिक्षा भोगत असताना तात्पुरती सुटका झाल्यावर घरी येऊन बापाने अकरा वर्षीय सावत्र मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीस अटक करण्यात आली आहे.

चार वर्षांपूर्वी अकरा वर्ष असलेल्या आपल्या मोठ्या मुलीवर या बापाने बलात्कार केला होता. त्यामुळे त्याला अटक करून कोठडीत रवानगी करण्यात आली होती. दरम्यान नराधम बाप काही दिवसांपूर्वी कारागृहातून सुटून बाहेर आला होता. तो पुन्हा या कुटुंबाच्या संपर्कात आला होता. त्याने घरी आल्यावर लहान मुलीवर बलात्कार केला.

पीडित मुलीच्या आईला ही बात समजल्यानंतर त्या मुलीला दवाखान्यात घेऊन गेली. डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी करताच देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी नराधम बापाला अटक करून कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान बापाला कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Copy