धक्कादायक: पुण्यात 2 चिमुरड्यांची हत्या करत दाम्पत्यांची आत्महत्या

0

पुणे: पुण्यात एका दाम्पत्यांनी पोटच्या दोन्ही मुलांची हत्या करत स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. सुखसागर नगर परिसरातील गल्ली क्रमांक एकमध्ये ही घटना घडली.पती-पत्नी आणि दोन लहानग्यांचा यामध्ये समावेश आहे. या धक्कादायक घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

अतुल दत्तात्रय शिंदे (३३ वर्ष), जया अतुल शिंदे (३२ वर्ष), ऋग्वेद अतुल शिंदे ( ६ वर्ष) आणि अंतरा अतुल शिंदे ( ३ वर्ष) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या चौघांचे मृतदेह घरात लटकलेल्या स्थितीमध्ये आढळून आले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा आणि आजूबाजूला चौकशी सुरू केली आहे.

Copy