धक्कादायक; पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 10, हजार पार

0

पुणे: देशासह राज्यात   कोरोनाबधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. राज्यात मुंबईनंतर कोरोनाविषाणू फटका पुणे जिल्ह्याला सर्वाधिक बसला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा 10 हजार पार झाला असून जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड या दोन शहरात होता. मात्र आता या विषाणूचा फैलाव ग्रामीण भागात होत असून; रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणाहून आलेल्या लोकांमुळे विषाणूचा फैलाव होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, हवेली, मुळशी, खेड, या तालुक्यात रुग्णांची संख्या वाढली आहे.

जिल्ह्यातील कोरणा बाधित यांची संख्या मंगळवार 9 रोजी रात्रीपर्यंत नऊ हजार 959 होती. यानंतर शहरासह जिल्ह्यात 53 नवे रुग्ण आढळून आल्याने 10 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 442 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Copy