धक्कादायक: दारू मिळत नसल्याने केले सॅनिटायझर प्राशन; ९ जणांचा मृत्यू

0

हैदराबाद : कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे मद्यविक्रीची दुकाने बंद आहे. मद्यपी दारूसाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे. परंतु हैद्राबादमध्ये दारू मिळत नसल्याने काहींनी चक्क सॅनिटायझर प्राशन केले. सॅनिटायझर प्राशन करणे जीवावर बेतले असून ९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आज शुक्रवारी ३१ रोजी ही घटना समोर आली आहे.

लॉकडाऊनमुळे हैद्राबाद राज्यातील अमरावती शहर आणि आसपासच्या भागातील दारुची दुकाने गेल्या १० दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे मद्यपींची गैरसोय झाली आहे, त्यातूनच हे गंभीर पाऊल उचलले आहे. नऊ मृतांमध्ये तीन भिकाऱ्यांचा समावेश आहे. यातील दोन जण इथल्या एका स्थानिक मंदिरात भिक मागत होते. त्यांना त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथेच त्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २५ वर्षांच्या तरुणापासून ते ६५ वर्ष वयांच्या व्यक्तींचा समावेश आहे.

Copy