धक्कादायक: जिल्ह्यातील दोन शिक्षकांसह दोन कर्मचारी कोरोनाबाधित

0

जळगाव: 23 नोव्हेंबरपासून संपूर्ण राज्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू कारण्यात येत आहे. त्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. जळगाव जिल्हयात 18 हजार शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. दरम्यान धक्कादायक म्हणजे चार शिक्षक,     शिक्षकेत्तर कर्मचारी कोरोना बाधित आढळले आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी याला दुजोरा दिला आहे. भुसावळ तालुक्यातील तीनपैकी एक शिक्षक तर दोन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

तर जळगाव तालुक्यातील एका शिक्षकाचा  समावेश आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नसताना शिक्षक कोरोना बाधित आल्याने पालकांची चिंता वाढली आहे.

Copy