धक्कादायक: गेल्या २४ तासात आतापर्यंतची सर्वाधिक कोरोनाग्रास्तांची नोंद 

0

नवी दिल्ली: देशातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. दररोज २० हजारापेक्षा अधिक रुग्ण देशात आढळून येत आहे. मागील २४ तासात देशात आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. २४ तासात २६ हजार ५०६ करोनाबाधित रुग्ण वाढले आहे.  त्यात ४७५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबळींची संख्या तब्बल २१ हजार ६०४ इतकी झाली आहे.

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आठ लाखांच्या जवळ पोहचल्याने मोठी चिंता वाढली आहे. सात लाख ९३ हजार ८०२ पैकी  दोन लाख ७६ हजार ६८५ जणांवर उपचार सुरू आहेत. तर चार ९५ हजार ५१३ जणांनी करोनावर मात केली आहे. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक असल्याने दिलासादायक परिस्थिती आहे.

Copy