धक्कादायक : एरंडोल येथे एकाच कुटुंबातील आठ जण पॉझिटिव्ह

0

एरंडोल-एरंडोल शहरासह ग्रामीण भागातील एकूण २९ स्वॅब चे अहवाल आज संध्याकाळी प्राप्त झाले असून त्यात एरंडोल येथील एकाच परिवारातील आठ जण पॉझिटिव्ह असल्याची माहिती प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी दिली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ३० वर्षीय महिला, ९ वर्षाचा मुलगा, १९ वर्षीय नवयुवक, १७ वर्षीय नवयुवक, १३ वर्षाचा मुलगा, ४५ वर्षीय पुरुष, ३६ वर्षीय महिला, १५ वर्षीय मुलगी, यांचा समावेश आहे. तसेच एरंडोल तालुक्यात ग्रामीण भागात उतरान येथे ०२ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती देण्यात आली. याप्रमाणे नव्याने एकूण १० पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आहे.

शहरात एकाच कुटुंबातील १२ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, त्यात गांधीपुरा एरंडोल ०२ ग्रामीण रुग्णालय सिस्टर ०१ , व उत्राण ०४. याप्रमाणे १९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मंगळवारी २९ स्वॅब च्या अहवालात १० रुग्ण पॉझिटिव्ह असल्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या २९ वर पोहोचले आहे त्यामुळे चिंता
व्यक्त केली जात आहे.

Copy