Private Advt

धक्कादायक : आग लागलेल विमान उतरल जळगाव विमानतळावर

जळगावभोपाळहून मुंबईच्या दिशेने चाललेल्या विमानाला आग लागली. विमानात खळबळ उडाली. म्हणुन जळगाव विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आणि यंत्रणा तातडीने दाखल झाली. जास्त टेन्शन घेऊ नका ही खरी खुरी घटना नव्हती तर जळगाव विमानतळावर राबविलेली ही मॉकड्रील होती. ज्यात जिल्हयातील पोलीस प्रशासनासह सुरक्षा यंत्रणा पास झाली.

 

नागरी उड्डायन प्राधीकरण व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या आदेशानुसार हे सराव प्रात्यक्षिक शुक्रवारी सकाळी सव्वा अकरा वाजता आपतकालीन तयारीची पाहणी करण्यासाठी जळगाव विमानतळावर घेण्यात आले. विमानाच्या इंजिनला आग लागल्याने जळगाव विमानतळावर इमर्रजन्सी लॅण्डींग करण्यात आल्याच्या सूचनेवरून जळगावातील अग्निशमन दल, सुरक्षा यंत्रणेसह आरोग्य कर्मचार्‍यांची धावपळ उडाली.

 

जीवाची पर्वा न करता या यंत्रणेच्या कर्मचार्‍यांनी विमानतळावर धाव घेतली. सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. यात प्रत्यक्ष घटनेच्या वेळी ज्या प्रमाणे यंत्रणा तत्परतेने कार्यरत होणे अपेक्षित असते, त्याची पडताळणी करण्यात आली. या सराव शिबाराचे निरिक्षण करण्यासाठी उप जिल्हाधिकारी, विमान प्राधीकरणाचे स्थानिक संचालक सुनिल मग्गेरीवार, औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा रुग्णालयाचे प्रा. डॉ. विलास मानकर आदींची उपस्थिती होती.